दापोली (वार्ताहर) - ग्रामीण जागृति कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ’संजीवनी’ गटातील विद्यार्थिनींनी साखलोली येथे ’रक्षक सापळ्या’द्वारे फळमाशी नियंत्रण या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित केले. यावेळी शेतकर्यांना रक्षक सापळ्याची कार्यपद्धती, बसविण्याची पद्धत व फायदे समजावून सांगण्यात आले. २-३ मि.ली.आकर्षक द्रव्य मिथाइल युजेनॉल (आंबा) किंवा क्यू ल्यूअर (काकडीवर्गीय पिके) कापसाच्या बोळ्यावर टाकून सापळ्यात ठेवण्यात आले. त्यामध्ये १ लिटर पाणी व थोडी साबण पावडर घालण्यात आली. प्रति हेक्टर ४ सापळे बसविण्याचा सल्ला देण्यात आला. काकडीवर्गीय पिकांसाठी सापळा १-२ फूट उंचीवर, तर आंबा बागेत २-३ मीटर उंचीवर बसवावा तसेच आकर्षक द्रव्य ६- ७ आठवड्यांनी बदलावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रात्यक्षिकामुळे शेतकर्यांना फळमाशी नियंत्रणासाठी फायदेशीर, पर्यावरणपूरक व प्रभावी तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादनाचे नुकसान टाळण्यासाठी रक्षक सापळा उपयुक्त ठरत असल्याचे सांगण्यात आले. उपस्थित शेतकर्यांनी या प्रात्यक्षिकास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले. भविष्यातही अशा शेतकरी हिताच्या तंत्रज्ञानाविषयी जनजागृती व प्रात्यक्षिके सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे ’संजीवनी’ गटाच्या विद्यार्थिनींनी सांगितले. सदर प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. समीर काळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.