loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर शहरातील तरुणावर कोयत्याने वार करून पलायन केलेला संशयित अटकेत

वेळणेश्वर - गुहागर शहरातील कीर्तनवाडी येथील एका तरुणावर कोयत्याने वार करून पलायन केलेल्या संशयित आरोपीला वाघर पोलिसांनी काही तासातच अटक केली. संदीप गिजे (वय ४४, गुहागर शहर) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. गुहागर येथील गणपती कारखानदार मंगेश माटल (४५) याच्यावर एका तरुणाने कोयत्याने वार केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता घडली होती. हल्ला करून हा संशयित फरार झाला होता. हल्लेखोरचा शोध पोलीस घेत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हल्लेखोर तरुणाने मंगेश माटल याच्यावर कीर्तनवाडी येथील घरी जाऊन कोयत्याने वार केले होते. यात माटल याचा चेहरा, मान, डोके आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे. माटल याच्यावर गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी तातडीने रत्नागिरी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही तासातच या हल्लेखोराचा शोध घेऊन त्याला अटक केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg