loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील 'श्री सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय, गुणदे' येथे प्रेरणादायी आणि स्तुत्य कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील 'श्री सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय, गुणदे' येथे नुकताच एक अतिशय प्रेरणादायी आणि स्तुत्य कार्यक्रम पार पडला. या विशेष सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रमोद जठार, भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांच्या उपस्थित मध्ये कार्यक्रम संपन्न झाला. सरस्वती शिक्षण संस्था, अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान आणि कै.डॉ.अशोक आंब्रे स्मृती वाचनालय, गुणदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात समाजासाठी आदर्श ठरणारे अनेक उपक्रम राबविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इयत्ता १० वी मधील प्रथम ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. माजी विद्यार्थी कै.शशिकांत राजाराम आंब्रे यांच्या स्मृतीनिमित्त ५ वी च्या विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप. सलग ८ वर्षे इयत्ता १० वी चा निकाल १००% राखल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी सुशिल जोशी आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. सदर वेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा उत्तर खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, स्वराज गांधी, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले, संदीप बांदिवडेकर, पप्पू निमनकर, यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg