loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरमध्ये प्रशासनाला शिवसेनेचा दणका, पूल मोकळा

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : कोकणात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने 'रेड अलर्ट' जाहीर केला आहे. या पावसाचा फटका गुहागर तालुक्यातील 'आरे' पुलाला बसला. पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेली मोठ-मोठी झाडे, लाकडाचे ओंडके आणि कचरा पुलाच्या खाली अडकल्याने पूल धोक्यात आला होता. ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला कळवूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. ही गंभीर बाब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला तालुका संघटिका सिद्धीताई सुर्वे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने जि.प. सदस्य व विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांना कळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विक्रांत जाधव यांनी तात्काळ प्रशासनाला धारेवर धरत अधिकाऱ्यांना जागे केले. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आणि तातडीने जेसीबीच्या साहाय्याने पुलाखाली अडकलेली सर्व झाडे व कचरा हटवण्यात आला. यामुळे मोठा अनर्थ टळला. संकटसमयी धावून येणाऱ्या विक्रांत दादांचे व सिद्धीताईंचे गुहागरच्या जनतेतर्फे मनःपूर्वक आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg