loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा श्रीराम मंदिर परिसरातील पुरातन पिंपळ वृक्ष पुन्हा एकदा जोमाने उभारी घेण्यास सज्ज

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातील श्रीराम मंदिर नजीक असलेला आणि काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह जोरदार कोसळलेल्या पावसामुळे शेकडो वर्षापूर्वीचा जुन्या पिंपळ वृक्षाची पुनर्लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांच्या धार्मिक भावना जोडल्या गेलेला पुरातन पिंपळ वृक्ष आता पून्हा एकदा जोमाने उभारी घेण्यास सज्ज झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रीराम मंदिर परिसरातील हा पिंपळ वृक्ष अनेक पिढ्यांचा साक्षीदार मानला जात होता. शहरातील नागरीकांच्या धार्मिक भावनांशी जोडला गेलेला पिंपळ वृक्ष 400 वर्षापूर्वीचा असून शहरातील अनेक झालेल्या स्थित्यंतराचा हा पिंपळ वृक्ष साक्षीदार असल्याचे बोलले जात आहे. काही दीवसापुर्वी झालेल्या वादळी वा-यासह कोसळलेल्या पावसामुळे वृक्ष उन्मळून पडला. त्यामुळे लांजा शहरातील अनेक नागरीकांनी दु:ख व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

सदर पिंपळ वृक्षाची अनेक जुण्या जाणत्या नारीकांच्या असलेल्या धार्मिक भावना लक्षात घेऊन लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर यांनी पिंपळ वृक्षाची पुनर्लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि शनिवार दीनांक 11जुलै रोजी शास्त्रोक्त पध्दतीने पिंपळ वृक्षाची पुनर्लागवड करण्यात आली. यावेळी बबन स्वामी, शिवाप्पा उकळी, संजय तेंडुलकर, नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांचेही सहकार्य लाभले. यावेळी वृक्ष प्रेमी, नागरीक उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे शहरातील नागरीकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg