loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील किंजळे (कळकरायवाडी) येथे दरडग्रस्त भागाची पाहणी

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील किंजळे (कळकरायवाडी) येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून रस्ता वाहून गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच वाडीतील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सुकिवली जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिन धाडवे साहेब यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित रस्ता सुरळीत करण्याच्या सूचना देत, वीजपुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी नवीन वीज खांब उभारून लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद काते, समीर राणीम तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg