loader
Breaking News
Breaking News
Foto

​भाटघरमध्ये शेतकरी जागृती: 'मित्र कीटकांना' वाचवा, शेतीला नफा मिळवा

दापोली(सागर गोवळे) - शेतीमध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या किडींना मारण्याच्या नादात अनेकदा शेतकरी नकळत 'उपयुक्त कीटकांची' हत्या करतात. हेच नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना निसर्गातील 'मित्र' ओळखण्याची दृष्टी देण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 'कृषीकन्या' गटाने भाटघर (ता. दापोली) येथे विशेष जनजागृती मोहीम राबवली. या उपक्रमामुळे भाटघरच्या शेतकऱ्यांना आता 'पर्यावरणपूरक आणि किफायतशीर शेती'चा नवा मार्ग सापडला आहे. अनेक शेतकरी सर्वच किडींना शत्रू समजून सरसकट कीटकनाशकांची फवारणी करतात. मात्र, कृषीकन्यांनी या गटचर्चेत हा समज खोडून काढला. निसर्गात अशा अनेक किडी आहेत, ज्या पिकांच्या सुरक्षेत मोठी भूमिका बजावतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये प्रामुख्याने: भक्षक कीटक: लेडीबर्ड बीटल, ग्रीन लेसविंग, प्रेइंग मॅन्टिस, कोळी आणि होव्हर फ्लाय. ​परागीभवन करणारे: मधमाश्या आणि बिनडंखी मधमाश्या. नैसर्गिक नियंत्रक: ट्रायकोग्रामा सारखे उपयुक्त कीटक. ​एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) काळाची गरज. ​भाजीपाला, आंबा, काजू आणि भात यांसारख्या प्रमुख पिकांवर होणाऱ्या अपायकारक किडींचे नियंत्रण कसे करावे, यावर यावेळी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक फवारण्यांचा खर्च कमी करून 'एकात्मिक कीड व्यवस्थापन' (IPM) पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्च घटतो आणि पिके आरोग्यदायी राहतात, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

​या उपक्रमात गावातील १५ शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांनी केवळ मार्गदर्शन ऐकून न घेता, आपल्या शेतातील अनुभव मांडले आणि उपयुक्त किडींच्या ओळखीबाबत प्रश्न विचारले. या संवादामुळे भाटघर परिसरात कीड निरीक्षणाचे महत्त्व आणि निसर्गाचा समतोल राखण्याबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.​"शेतकऱ्यांनी रासायनिक फवारणीऐवजी नैसर्गिक शत्रू किडींच्या संवर्धनावर भर दिल्यास उत्पादन खर्च निश्चितपणे कमी होईल आणि पिके विषमुक्त होतील. ही जनजागृती होणे हेच या उपक्रमाचे खरे यश आहे. ​हा उपक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. विजय देसाई, डॉ. समीर काळे, डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg