loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प च्या कान्हे शाळेत 'माझ गाव आरोग्य संपन्न गाव' मोहीम

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - चिपळूण तालुक्यातील जि. प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा, कान्हे, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, अडरे अंतर्गत उपकेंद्र वेहेळे यांच्या वतीने 'माझ गाव आरोग्य संपन्न गाव' मोहीम राबवण्यात आली. यावेळी डेंग्यू प्रतिरोधक जनजागृती अभियानानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.तसेच “डेंग्यूमुक्त माझे गाव, माझी जबाबदारी” या विषयावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुला-मुलींचा मेळावा घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, अडरेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री फडके यांनी मुलांना कीटकजन्य आजार, जलजन्य आजार तसेच HPV लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य सहाय्यक जाधव यांनी हिमोग्लोबिन (HB) तपासणीबाबत माहिती दिली. आरोग्य सेविका पवार यांनी वैयक्तिक स्वच्छता व योग्य पद्धतीने हात धुण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य सेवक निखिल वारके यांनी डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रणाबाबत जनजागृती केली.

टाईम्स स्पेशल

निबंध स्पर्धेतील ६ विजेत्या विद्यार्थ्यांना पॅड, वही व पेन तसेच चित्रकला स्पर्धेतील 6 विजेत्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंग साहित्य देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg