loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक समिती खेड आयोजित गुणगौरव सोहळा उत्साहात

खेड - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड आयोजित विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल भरणे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक, प्राथमिक शिक्षकपतपेढीचे चेअरमन सुनील दळवी, माजी चेअरमन सुनील सावंत, कोकण विभाग प्रमुख रुपेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश भागणे, माजी उपाध्यक्ष संजय सुर्वे, मोहाने हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय नायकल, जिल्हा कार्यालय चिटणीस मुकुंद वाजे उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, बीडीएस, मंथन दहावी, बारावी, जेईई, नीट, पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले शिक्षकांचे पाल्य आदी तिनशे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आदर्श शाळा, आदर्श शिक्षक कला क्रीडा या क्षेत्रामधील गुणवंत शिक्षक नूतन केंद्रप्रमुख आदी गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश ठोंबरे यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केले. तर आभार सचिव धर्मपाल तांबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, नवनीत घडशी, अनिल यादव, शैलेश पराडकर, दिलीप यादव, श्रीकृष्ण खांडेकर, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर, नरेश ठोंबरे, संजय सुर्वे, सुनील पांगुळ, दिनेश पवार, प्रमोद कदम, भागोजी कडव, महेंद्र शिंदे, चंद्रकांत पवार, अनंत शिंदे, अजय साबळे, अशोक पाटील, विजय कासार, शशिकांत भुवड, नारायण शिरकर, बबन मोरे, अनिल आंजर्लेेकर, कृष्णा पवार, गजानन पालांडे, सुरसिंग ठाकरे, राजाराम दरेकर, सचिन गावडे, भरत बोडके, सतीश गजमल, अनंत मोरे, सुनील जंगम, रोहन देवकते, सुविधा सावंत, दीप्ती यादव, स्नेहल बामणे, अंकिता भोसले, सरला मावळी, शर्वरी भोसले, किरण जानकर, रश्मी कोलगे, ऋतुजा तांदळे, विधी बने, दीपाली पालवे, सुजाता चाळके, रसिका रेवाळे, अनुराधा शिंदे, पूजा भावे, रश्मी पालांडे, कल्याणी कासार, सुनिता तांदळे, पाटकर, मंगल थोरात आदींनी प्रयत्न केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg