loader
Breaking News
Breaking News
Foto

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जण पुन्हा हिंदू धर्मात

ओल्ड गोवा, दि. १४: ओल्ड गोवा (बायंगीणी,)उपपिठ येथे अन्य धर्मात गेलेल्या११५ जणांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मंगळवारी झाला. सर्वांना वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक वातावरणात विधिवत हिंदू धर्मात सन्मानपूर्वक पुनर्प्रवेश देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परधर्मीय धर्मप्रचारकांच्या आमिषांना व भुलथापांना बळी पडून आपल्या मूळ सनातन हिंदू धर्मापासून ते दूर गेले होते. या बांधवांनी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रभावित होऊन स्वेच्छेने हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला. वैदिक मंत्रोच्चार आणि शास्त्रोक्त विधीनुसार त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी याच उपपीठावर ३०० बांधवांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश करण्यात आला होता. आजच्या कार्यक्रमानंतर जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात राबविण्यात येणाऱ्या या धर्मकार्यातून आतापर्यंत 1 लाख 56 हजार 129 बांधवांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला आहे.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी म्हणाले," चुकीचे मार्गदर्शन करून आणि विविध आमिषे दाखवून त्यांच्या मूळ धर्मापासून दूर नेण्यात आले होते. आज त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ सनातन धर्मात सन्मानाने स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या पारंपरिक उपासना पद्धतीचे पुनर्स्थापन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेला प्रत्येक बांधव आपल्या स्वेच्छेने आणि आनंदाने हिंदू धर्मात परत आला आहे." पुनर्प्रवेशित बांधवांनीही आपल्या मूळ धर्मात सन्मानाने परतण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. देशभरात अव्याहतपणे सुरू असलेल्या या धर्मकार्यातून परधर्मात गेलेल्या हिंदू बांधवांना सन्मानपूर्वक पुनर्प्रवेश देण्याचा उपक्रम समाजात जागृती निर्माण करणारा आहे. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी या माध्यमातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg