वणोशी तर्फ पंचनदी (सागर गोवळे) - शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव (आरएडब्लूइ) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी सखी’ गटाने वणोशी तर्फ पंचनदी येथे एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला. प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण उजाळ यांच्या शेतावर ‘रुपाली’ या भात जातीच्या माध्यमातून ’ओळीत रोपलागवड’ (लाईन ट्रान्सप्लॅटिंग) याचे यशस्वी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या प्रात्यक्षिकादरम्यान ‘कृषी सखी’ गटातील विद्यार्थिनींनी शेतकर्यांना हाताशी धरून प्रत्यक्ष शेतात ओळीत लागवड करून दाखवली. यामध्ये प्रत्येक रोपांमध्ये १५ सें.मी. २० सें.मी. चे अचूक अंतर ठेवण्यावर भर देण्यात आला, जेणेकरून रोपांची वाढ जोमाने होईल.
विद्यार्थिनींनी उपस्थितांना या पद्धतीचे महत्त्व पटवून देताना खालील फायदे सांगितले. पिकात हवा खेळती राहिल्याने रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. सर्व रोपांना समान सूर्यप्रकाश मिळाल्याने प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया सुधारते. ठराविक अंतरामुळे तण नियंत्रण आणि आंतरमशागतीची कामे अत्यंत सुलभ होतात. झाडांमधील पोषक घटकांसाठी होणारी स्पर्धा कमी झाल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते. प्रात्यक्षिकानंतर बोलताना शेतकरी लक्ष्मण उजाळ म्हणाले, ही पद्धत खरोखरच प्रभावी आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा यात कष्ट कमी आणि उत्पन्न जास्त मिळण्याची शाश्वती वाटते.
या उपक्रमामुळे परिसरातील इतर शेतकर्यांमध्येही सुधारित तंत्रज्ञानाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सदर उपक्रम डॉ. व्ही. जी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या यशस्वी नियोजनात शबरी चव्हाण, संजना जंगले, मधुजा घडशी, पायल मोरे, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू, देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम., मुस्कान कसोटीया आणि नित्या राज या विद्यार्थिनींनी मोलाची भूमिका बजावली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.