सावंतवाडी (प्रतिनिधी) : "सावंतवाडी ही कोकणची सांस्कृतिक राजधानी आहे. या नगरीत 'सम्राट इंटरनॅशनल क्लब'च्या निमित्ताने संगीत, संस्कृती आणि कला जपण्याचा व त्यांचे संवर्धन करण्याचा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. सावंतवाडीला मोठा सांस्कृतिक आणि कला वारसा लाभला असून, भविष्यात सम्राट क्लबच्या अशा उपक्रमांसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल," असा शब्द सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिला. ते सावंतवाडी येथील 'पर्णकुटी विश्रामगृह' येथे आयोजित एका छोटेखानी विशेष समारंभात बोलत होते. गोवा-मये येथील सम्राट इंटरनॅशनल क्लबच्या अंतर्गत नव्याने स्थापन होत असलेल्या 'सम्राट क्लब सावंतवाडी शहर' च्या या सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये मालवणी कवी दादा मडकईकर, मये सम्राट क्लबचे अध्यक्ष नरेश पेडणेकर, सैनिक सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, संचालन अर्जुन नाईक, आगामी सम्राट क्लब सावंतवाडी शहराचे पदाधिकारी नरेंद्र देशपांडे, हरिश्चंद्र पवार, ॲड. सिद्धी परब, स्मिता केंकरे, पत्रकार तथा प्रा. रूपेश पाटील, सज्जन बोरकर आदींचा समावेश होता.
'सम्राट संगीत सितारा २०२६' चा मानकरी ठरलेला हर्ष नकाशे याच्यासह शास्त्रीय संगीत स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवलेल्या सिंधुदुर्गातील अन्य गुणवंत कलाकारांचा गौरव याप्रसंगी करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यात उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते खालील विजेत्या कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला: हर्ष नकाशे: 'सम्राट संगीत सितारा २०२६' चा मुख्य विजेता. पल्लवी पिळणकर (माणगाव, ता. कुडाळ): प्रथम फेरीतील विजेती. साहिल देसाई (मणेरी, ता. दोडामार्ग): प्रथम फेरीतील विजेता. श्रुती सावंत: गतवर्षीची 'संगीत सितारा' विजेती यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात मय सम्राट क्लबचे अध्यक्ष नरेश पेडणेकर यांनी सम्राट क्लबच्या ध्येयधोरणांचा आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. या संगीत स्पर्धेत तीन राज्यांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्या सर्व स्पर्धकांमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या सुपुत्रांनी आणि सुकन्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही 'संगीत सितारा' विजेतेपदाचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच मिळाला, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. कार्यक्रमाचे नेटके संचालन अर्जुन नाईक यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष चिटणीस यांनी तर उपस्थितांचे आभार सुनील राऊळ यांनी मानले. या प्रसंगी सावंतवाडी परिसरातील संगीतप्रेमी, रसिक नागरिक आणि कलाकारांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.