loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेली गटारे बुजली, झाडी वाढल्याने अपघाताच्या घटना

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हापरिषद विभागाच्या आखत्यारीत येणा-या रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे बुजली गेली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वहात आहे. बहुतांश ठिकाणी रस्त्यावर झाडी वाढली आहे. तर समोरचे वहान दिसून येत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र संबंधित यंत्रणेला याचे देणे घेणे नसल्याचे दिसून येत असून कोणाची भिती राहिली नसल्यामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गटारे बुजून साईट पट्टी आणि गटारे एक झाली आहेत. काही ठिकाणी गटारातच मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याचे दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाढलेली झाडी रस्त्यावर येत असल्याने समोरुन येणारे वहान दिसून येत नाही. त्यामुळे वहानधारकांतून अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गटारांची साफसफाई न केल्यामुळेच गटारे बुजली गेल्याचे स्थानिकांतून बोलले जात आहे. गटारात झाडी वाढल्याने पाण्याचा निचरा गटारातून होत नाही, यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पाण्याचा निचरा रस्त्यावरून होत असल्याने रस्तेही लवकर खराब होताना दिसून येत आहेत. मात्र संबंधितांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याची नाराजी जनतेतून व्यक्त केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

आधिच रस्त्याचे डांबरीकरणासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो, डांबरीकरण झालेला रस्ता किती वर्ष टिकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण टिकून रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा गटारातून झाला पाहिजे यासाठी रस्त्याच्या बाजूने गटार काढले जातात. मात्र काही रस्त्याना गटारे राहीली नाहीत याला जबाबदार कोण? असा सवालही जनतेतून केला जात आहे. संबधित यंत्रणेकडून तालुक्यातील रस्त्यांच्या गटाराची पहाणी करून ज्या ठीकाणी गटारे बुजली गेली आहेत, अशी गटारे साफ करावीत, तसेच वाढलेली झाडी तोडण्यात यावी, अशी मागणी जनतेतून केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg