loader
Breaking News
Breaking News
Foto

घरगुती गॅस वितरणात बायोमेट्रिक प्रणाली लागू करा : प्रसाद आडवणकर

मालवण (प्रतिनिधी) : घरगुती गॅस सिलेंडरचा वाढता काळाबाजार, अनधिकृत विक्री आणि ग्राहकांच्या नावावर होणारा गैरवापर थांबवण्यासाठी रेशन दुकानांप्रमाणेच गॅस वितरणातही बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचा ठसा (थम) घेण्याची प्रणाली लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद आडवणकर यांनी केली आहे. आडवणकर यांनी म्हटले आहे की, घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना अनेकदा रांगेत उभे राहावे लागते. दुसरीकडे, घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर आणि अनधिकृत विक्री होत असल्याच्या तक्रारी सतत समोर येत आहेत. या पार्श्वभुमीवर रेशन दुकानांमध्ये धान्य वितरणावेळी लाभार्थ्याचा अंगठ्याचा ठसा घेतला जातो. त्याच धर्तीवर गॅस सिलेंडर वितरणावेळीही ग्राहकाची बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करावी. त्यामुळे सिलेंडर खरंच संबंधित ग्राहकालाच मिळाला आहे, याची खात्री होईल आणि बनावट वितरण, फसवणूक तसेच काळाबाजाराला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असे आडवणकर यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg