loader
Breaking News
Breaking News
Foto

मंजूर रस्ता खुला करण्याची रहिवाशांची मागणी; पालिकेच्या दिरंगाईवर नाराजी

खेड : खेड नगरपरिषदेच्या हद्दीतील दापोली रस्ता ते गांधी चौककडे जाणारा मंजूर रस्ता पालिकेकडे हस्तांतरित करून रहदारीसाठी खुला करून द्यावा, अशी मागणी अथर्व हाईट्स सह नजीकच्या दोन इमारती मधील रहिवाशांकडून करण्यात आली आहे. याबाबत नगरपालिकेकडे निवेदन देऊन तब्बल सहा महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रहिवाशांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित परिसरातील तीन इमारतींच्या पार्किंग जवळून जाणाऱ्या १२ मीटर रुंदीच्या मंजूर रस्त्यावर भिंत घालून अडथळा निर्माण करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मार्गावरून वाहनांची ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या कंपाऊंड भिंतीमुळे पार्किंगमध्ये वाहन थेट नेता येत नसून लगतच्या अरुंद वाटेवरून मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः अरुंद जागेमुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात यापूर्वी १५ डिसेंबर २०२५ रोजी खेड नगरपरिषदेकडे लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, सहा महिने उलटूनही पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, याबाबत खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित रस्ता मुकादम डेव्हलपर यांनी त्यांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेकडे हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप तो रस्ता पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही. याबाबत संबंधितांना तातडीने पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg