loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग कळणे सडयावर मृत गाय-वासरू आढळले, सरपंच जमीन मालक यांनी पुढाकार घेऊन केले दफन

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते बांदा मार्गावर कळणे सडयावर कोणी अज्ञात इसमाने चार चाकी वाहनात भरून मेलेली गाय तसेच काही दिवसांपूर्वी जन्म झालेले मृत वासरू शनिवारी रात्री उशिरा सडयावर आणून टाकल्याने संताप व्यक्त होत आहे. माणूस की हैवान गोमाता तिचे वासरू यांच्यावर खड्डा खोदून अंत्यसंस्कार करण्याचे सोडून अशा प्रकारे उघडयावर गाय वासरू टाकणार्‍याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान सरपंच अजित देसाई, ग्रामस्थ आणि जमीन मालक यांनी पुढाकार घेऊन जेसीबी मशीन आणून खड्डा खोदून गाय आणि वासरू यांना दफन केले. गोमाताप्रेमी यांनी सरपंच ग्रामस्थ यांचे आभार मानले. आपण गायीला गोमाता मानतो शासनाने गाईला राज्य दर्जा दिला आहे. आजही अनेक ठिकाणी गावठी पाळीव जनावरे पाळली जात आहेत. काही विघ्नसंतोषी दलाल जनावरे यांची तस्करी देखील करतात.

टाईम्स स्पेशल

असे असताना कळणे सडयावर अशा प्रकारे मृत गाय वासरू टाकल्याने संताप व्यक्त केला जात आहे.कळणे भिकेकोनाळ सरपंच अजित देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गाय वासरू वाहनात भरून घटनास्थळी आणून टाकल्याचे वाहनाचे टायरच्या निशाणावरुन दिसून आले. एक तर खड्डा खोदून पुरले असते तर काही वाटले नसते. अशा प्रकारे उघडयावर टाकणे यामुळे परिसरात दूर्गधी पसरू शकते, असे सरपंच अजित देसाई यांनी सांगून अशा लोकांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg