रत्नागिरी : परदेश दौर्यावर नेण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका वकील आणि एका नगरसेविका अशा दोन महिलांची तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दिल्ली येथील एका टूर कंपनीच्या चालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी सुदेश मयेकर (वय ४५, रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) आणि त्यांची मैत्रीण तसेच नगरसेविका वैभवी विजय खेडेकर यांनी ’मेक माय ट्रिपु’ या कंपनीमार्फत टर्की (इस्तंबूल) येथे सहलीचे नियोजन केले होते. २४ एप्रिल २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
दोघींनी कंपनीचा चालक संदीप कुमार याच्याशी संपर्क साधला होता. त्याच्या सांगण्यानुसार टूर पॅकेजसाठी समृद्धी मयेकर यांनी ५ लाख रुपये, तर वैभवी खेडेकर यांनी त्यांच्या कुटुंबासाठी ७ लाख ४० हजार रुपये असे एकूण १२ लाख ४० हजार रुपये कंपनीच्या विविध बँक खात्यांमध्ये जमा केले. मात्र, पैसे स्वीकारूनही आरोपीने त्यांना परदेश दौर्यावर नेले नाही. तसेच भरलेली संपूर्ण रक्कमही परत न करता त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर समृद्धी मयेकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी संदीप कुमार (वय ५१, रा. रोहिणी सेक्टर-११, उत्तर-पश्चिम दिल्ली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (इछड) २०२३ च्या कलम ३१८(४) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.