loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री रामेश्वर विद्यालय कोंडगे शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - नावेरी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री रामेश्वर विद्यालय, कोंडगे येथे सन २०२५ च्या दहावीच्या बॅचमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी वर्ष भर मेहनत करून मिळविलेल्या या शैक्षणिक यशाचा गौरव दरवर्षी केला जात असल्याने विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक मंडळाच्या अध्यक्षा विजया विश्वासराव होत्या. प्रमुख उपस्थितींमध्ये मुंबई मंडळाचे अध्यक्ष नरेश चव्हाण, शाळा समितीचे चेअरमन डॉ. एस. व्ही. कदम, स्थानिक कार्यक्रम मंडळाचे सचिव श्रीधर विश्वासराव, सहसचिव महेश विश्वासराव, संस्था सल्लागार दादा खामकर, बाळकृष्ण गुरव, विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते रमेश काटकर तसेच उपाध्यक्ष तानाजी जाधव यांची उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रमुख पाहुणे तथा माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते रमेश काटकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आकर्षक भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. एनएमएमएस व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी रमेश काटकर, श्रीधर विश्वासराव, नरेश चव्हाण आणि गोरे (लांजा) यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व याविषयी मौलीक मार्गदर्शन केले. या गुणगौरव सोहळ्यास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg