loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवणे शाळा नं. १ चा स्तुत्य उपक्रम, विद्यार्थ्यांनी तयार केले सिडबॉल

जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं. १ च्या शाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सीडबॉल अर्थात बीजगोळे तयार करणे हा उपक्रम राबविला. या शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व ४५ विद्यार्थ्यांनी जवळपास ८० सीडबॉल तयार करून ते शाळेजवळील जंगल भागात फेकले. या सिडबॉलसाठी फणस, काजू, चिंच इ. च्या बिया वापरण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सीडबॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक शाळेतील -शिक्षिका मनिषा राऊळ यांनी प्रात्यक्षिकासह दाखविले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक युवराज गोसावी, उपशिक्षक बापुशेट कोरगांवकर व पालक यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे आरोंदा केंद्राच्या केंद्रप्रमुख स्नेहल मुळे, आजगाव प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी गावीत यांनी कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg