दापोली (सागर गोवळे) : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या शेतकरी वर्ग पारंपरिक शेतीसोबतच फळबाग लागवडीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत असून, आंबा आणि काजूच्या नवीन कलमांची लागवड करतांना (बोरिवली आडिवाडी) गावातील शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला आहे. दापोली तालुक्यातील शेतकरी केवळ हंगामी पिकांवर अवलंबून न राहता दिर्घकालीन आणि शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून फळबागांकडे वळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने हापुस आंबा (डोंगरी हापुस) आणि काजू पिकाच्या नवीन जातींच्या लागवडीवर भर दिला जात आहे. परिसरात पावसाची चाहूल लागताच शेतशिवारात रोपांची लागवड, खड्डे खणणे आणि शेतीची मशागत करण्याची लगबग पाहायला मिळत आहे.
शेतकरी आता जुन्या पद्धती बदलून आधुनिक आणि दर्जेदार कलमांची निवड करत आहेत. योग्य अंतरावर खड्डे तयार करणे, शेणखताचा वापर करणे आणि रोपांची निगा राखणे याबाबत शेतकरी विशेष काळजी घेताना दिसत आहेत. या लागवडीमुळे आगामी काळात कोकणातील फळोत्पादनात मोठी वाढ होईल, असा विश्वास कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. "आमच्या भागात दरवर्षी आंबा आणि काजू उत्पादनावर ग्रामीण अर्थकारण अवलंबून आहे. नवीन कलमांची लागवड करून भविष्यात चांगल्या उत्पन्नाची आस शेतकऱ्यांनी धरली आहे, मात्र यासाठी सिंचनाची आणि रोपांच्या संरक्षणाची योग्य सोय होणे गरजेचे आहे."









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.