loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय पाचल बाजारपेठेतच होणार; नागरिकांमध्ये संभ्रम पसरवू नये : पाचल तालुका निर्मिती कृती समिती

राजापूर (तुषार पाचलकर) - प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय पाचलमध्येच असून ते पाचलच्या मध्यवर्ती बाजारपेठ परिसरातच कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे कार्यालयाच्या जागेबाबत अथवा स्थानाबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पाचल तालुका निर्मिती कृती समितीने केले आहे. कृती समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अप्पर तहसील कार्यालयासाठी पाचलमध्ये जागेची कोणतीही अडचण नाही. बाजारपेठ परिसरात तसेच लगतच्या भागात आवश्यक शासकीय जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जागेअभावी कार्यालय इतरत्र हलवावे लागेल, अशा चर्चांना कोणताही तथ्याधार नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समितीने स्पष्ट केले की, पाचलमधील बहुतांश शासकीय कार्यालये स्वतःच्या जागेत कार्यरत असून ती एकमेकांच्या जवळ आहेत. महसूल, बँकिंग, पोस्ट, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि इतर सार्वजनिक सेवा देणारी कार्यालये पाचल बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे नागरिकांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पायी जाणेही सहज शक्य होईल. याशिवाय पाचल बाजारपेठेत बँका, पोस्ट कार्यालय, ई-सेवा केंद्रे, शैक्षणिक संस्था, मेडिकल दुकाने, दवाखाने, कृषी सेवा केंद्रे, व्यापारी आस्थापने, एसटी बसस्थानक तसेच खासगी वाहतुकीची सुविधा उपलब्ध असल्याने कार्यालयीन कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व आवश्यक सेवा एकाच परिसरात मिळू शकतील. यामुळे वेळ, पैसा आणि प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल.

टाईम्स स्पेशल

कृती समितीने पुढे नमूद केले की, अप्पर तहसील कार्यालयाचे मुख्यालय निश्चित करताना उपलब्ध पायाभूत सुविधा, प्रशासकीय सुसूत्रता आणि नागरिकांची सोय या बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे. या सर्व निकषांवर पाचल बाजारपेठ सर्वाधिक सक्षम आणि नैसर्गिक पर्याय ठरते. “पाचलमध्ये जागेची कोणतीही कमतरता नाही. प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय पाचल बाजारपेठ परिसरातच कार्यान्वित होईल. त्यामुळे अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या चर्चांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी एकजूट कायम ठेवावी,” असे आवाहन पाचल तालुका निर्मिती कृती समितीने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg