loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये सायबर फसवणुकीचे दोन गुन्हे; सहा राज्यांतील नागरिकांना गंडा एसबीआयच्या दोन खात्यांचा गैरवापर, ८१ हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक

खेड : खेड पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मधील दोन बँक खात्यांचा वापर करून विविध राज्यांतील नागरिकांची एकूण ८१ हजार ४२० रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पहिल्या प्रकरणात, ५ ऑगस्ट २०२५ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एसबीआयच्या एका खात्यात रायगड व मुंबई येथील तीन तक्रारदारांकडून २० हजार ५०० रुपये जमा करून फसवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तर दुसऱ्या प्रकरणात, १९ मार्च २०२५ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत एसबीआयच्या दुसऱ्या खात्याद्वारे बिहार, दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील चार तक्रारदारांकडून ६० हजार ९२० रुपये स्वीकारून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८ (४), ३१९ (२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६ (ड) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी संगनमताने बँक खाती उघडून त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याचा आरोप असून खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg