नवी दिल्ली : आजची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेले कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाचे पडसाद आता संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात असे जगभरातील उमटत आहेत. राहुल गांधी यांनी इतर खासदारांसह थे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेऊन सुमारे तीन तासानंतर त्यांची सुटका केली. पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलक व विरोधकांची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यादरम्यान संयमी भूमिका असून सत्ताधारी पक्षातीलच काही आमदार व समर्थक या आंदोलनामध्ये तेल ओतण्याचे प्रयत्न करीत आहे, त्यांच्या भडक विधानामुळे महाराष्ट्र तापू लागला आहे.
आता विरोधकांचाही पाठिंबा आंदोलनाला मिळाला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज जंतर-मंतर येथे आंदोलन स्थळी भेट देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख व माजी संरक्षण मंत्री शरदचंद्र पवार आणि अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव तसेच वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी माराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या आंदोलनामुळे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबाबत सर्व गैरसमज दूर झाले असून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनात त्यांची भूमिका सर्वसामान्य जनतेसाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्याचवेळी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेत्याला उचलण्यात आले की बाबही गांभीर्याने घेतली जात आहे.
गेले दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. पुण्यातील एफ टी आय आय, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्या त स्थानिक पातळीवर आंदोलने सुरू आहेत. राज्यभरातच ठीक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलने सुरू आहेत. राजधानी दिल्लीत ज्या पद्धतीने निशस्त्र विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला त्याचा निषेध देशभरातून केला जात आहे. पोलीस देखील या घटनेत जखमी झाले आहेत. दिल्ली पोलीस प्रशासनाला सामान्य स्थितीत विद्यार्थी आंदोलनाची स्थिती हाताळता आली नाही ,असे तज्ञांचे मत आहे. शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होऊ शकला असता पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बेदखल करण्यात आल्याचे म्हटले जाते, राजधानी दिल्लीत आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत, राहुल गांधी यांच्या अटके संदर्भातील पडसाद आज संसदेत उमटतील , असे राजकीय तज्ञांचे मत आहे. दरम्यान पोलीस गणवेशात नसलेल्या अनेक तरुणांनी हातात रबरी दांडके घेऊन अनेक तरुणांना निर्दयी मारहाण केली आहे ,याच्या चौकशीची मागणी केली जात आहे. ते कोण होते याचा तपास करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. सध्या शंभरहून अधिक विद्यार्थी रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यातील अनेक गंभीर जखमी आहेत. सहा महिने अभ्यास करून नीट पेपर रद्द झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये इतकी मदत शासनाने करावी अशी मागणी विद्यार्थी आंदोलनाने केली आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन दुर्लक्षित करून केंद्र सरकारला अनेक तोटे सहन करावे लागणार आहेत, विद्यार्थी आंदोलनातूनच मोठे बदल झाले आहेत, सरकार उलटवून टाकण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये आहे त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज राजकीय तज्ञ व्यक्त करीत आहेत. केंद्र सरकार शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही असे म्हटले जात असतानाच विरोधकांनी राजीनामाचा आग्रह धरला आहे, धर्मेंद्र प्रधान हे ओरिसा मधून असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नेते आहेत, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम केले आहे, त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मेंद्र प्रधान यांच्या बाजूने आहे, संघाच्या आदेशाशिवाय प्रधान यांना दूर करता येणार नाही त्यामुळे आता केंद्र सरकारची मोठीच कोंडी झाली आहे. त्यातच आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याने केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण होत आहे ,जनमत बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारला लाभलेली सहानुभूती या आंदोलनामुळे कमी होणार असल्याने भाजपा सह घटक पक्ष नाही त्याचा भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.