मंडणगड (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, तुळशी येथे रानभाज्या प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. तुळशी केंद्राच्या केंद्रप्रमुख रश्मी नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांची माहिती व त्यांचे पौष्टिक महत्त्व प्रभावीपणे मांडले. यावेळी संतोष पोस्टुरे, जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा तुळशीचे मुख्याध्यापक पंदिरकर, वेल्हाळ, करंजकर, न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रद्धा नटे, सहाय्यक शिक्षक सुरेश कोतवाल, प्रदर्शनाचे संकल्पक गोताड, विद्यालयाचे लिपिक कैलास धाडवे तसेच शाळेचे माजी विद्यार्थी आयुष्य डाकवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुरेश कोतवाल व विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वरबद्ध स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर गोताड यांनी रानभाज्या प्रदर्शनामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांना स्थानिक जैवविविधता आणि पारंपरिक आहारसंस्कृती जपण्याचे महत्त्व सांगितले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध रानभाज्यांची ओळख, त्यांचे औषधी गुणधर्म, पोषणमूल्ये आणि दैनंदिन आहारातील उपयोग याबाबत माहिती दिली. समारोपप्रसंगी केंद्रप्रमुख रश्मी नगरकर यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व, स्थानिक अन्नपरंपरेचे जतन आणि नैसर्गिक अन्नसंपदेचे संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाला जिल्हा परिषद आदर्श शाळा, तुळशी येथील विद्यार्थ्यांनीही भेट देत प्रदर्शनाचा लाभ घेतला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.