दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात संजय गांधी निराधार योजना समिती अद्याप गठित करण्यात आलेली नसल्याने शेकडो पात्र व गरजू लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून समिती गठित करावी, अशी मागणी दोडामार्ग काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी केली आहे. गावागावातील खर्या अर्थाने निराधार, विधवा, दिव्यांग, परित्यक्ता महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांची माहिती स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनाच असते. मात्र समितीच अस्तित्वात नसल्याने अशा लाभार्थ्यांची योग्य ओळख होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे बाबू गवस यांनी म्हटले.
केवळ प्रशासकीय अधिकारी किंवा शासकीय यंत्रणेला प्रत्येक गावातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीची संपूर्ण माहिती असणे शक्य नसल्याने अनेक पात्र लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे समितीची अनुपस्थिती ही गरजू नागरिकांवर अन्याय करणारी ठरत असल्याची टीका त्यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन दोडामार्ग तालुक्याची संजय गांधी निराधार योजना समिती त्वरित गठित करावी. तसेच सर्व ग्रामपंचायतींकडून पात्र लाभार्थ्यांची यादी मागवून प्रलंबित प्रस्तावांचा तत्काळ निपटारा करावा, जेणेकरून एकही पात्र आणि गरजू नागरिक शासनाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी मागणी दोडामार्ग काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी केली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.