साटेली भेडशी (प्रतिनिधी) - दशावतार कलेतील ज्येष्ठ कलाकार कै. रामचंद्र बाबुराव राणे उर्फ बाबा राणे-कोनसकर यांना दशावतार स्मृती कलागौरव पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याचा निर्णय आदर्शगाव केर येथील फ.रा प्रतिष्ठानने घेतला असून, याची घोषणा नुकतीच करण्यात आली. कोनसकर घराण्याची चौथी पिढी दशावतार लोककलेची सेवा करत आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिल्पग्राम, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. फ.रा प्रतिष्ठान आणि स्नेहबंध ग्रुप, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दशावतार क्षेत्रातील गुरुपौर्णिमा सोहळा साजरा केला जातो.
यावर्षीच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमातच कै. बाबा राणे-कोनसकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना मरणोत्तर दशावतार स्मृती कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती फ.रा प्रतिष्ठानच्या समितीचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी दिली. दशावतार कलेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी कै. बाबा राणे-कोनसकर यांनी दिलेले मोलाचे योगदान लक्षात घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला.कै. बाबा कोनसकर यांनी ३० वर्षे दशावतार रंगभूमीची सेवा केली, पार्सेकर, नाईक, मामा, आरोलकर, आजगावकर, तसेच आपल्या लहानपणी आजगावकर मंडळाचे संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली.
कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेत द्रौपदी वस्त्रहरण या नाटकात शकुनी या भूमिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते. अशी माहिती दादा कोनसकर यांनी दिली आहे. ज्येष्ठ आणि आघाडीचे अनुभवी कलाकार दादा राणे कोनसकर यांचे आजोबा कै.बाबुराव रामचंद राणे, वडील कै.बाबा कोनसकर, त्याचे बंधू लोकप्रिय राजा उदय कोनसकर, चिरंजीव राम राणे कोनसकर अशी चौथी पिढी दशावतार लोककलेसाठी वाहून घेतले आहे. त्यांच्या कार्याला ही कृतज्ञ मानवंदना असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.