loader
Breaking News
Breaking News
Foto

आता सावंतवाडी नगरपरिषदेने सुद्धा मोफत दहनाचा निर्णय घ्यावा; माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी

सावंतवाडी, (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगरपरिषदेने नागरिकांना स्मशानभूमीमध्ये दहनाच्या वेळी अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे मोफत पुरवावीत, अशी मागणी सावंतवाडी शहर हितवर्धक मंचाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन लवकरच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश भोगटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या सावंतवाडी नगरपरिषद दहनावेळी वापरण्यात आलेल्या लाकडाचे जवळजवळ २९७० रुपये आकारत आहे. अंत्यविधीसाठी साधारण ३००० रुपये ही रक्कम गोरगरीब कुटुंबासाठी फार मोठी अडचणीची ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली अनेक वर्षे ही रक्कम कमी होती, मात्र आता ती वाढत वाढत ३००० रुपयांपर्यंत आली आहे. प्रत्यक्षात दहनावेळी वापरण्यात येणाऱ्या जळाऊ लाकडाची लाकूड व्यापाऱ्याकडील किंमत बघितली तर ती ८०० ते ९०० रुपये एवढीच होऊ शकते. मात्र, नगरपालिका यासाठी तब्बल २९७० रुपये आकारत आहे. दुःखद प्रसंगी गरीब कुटुंबाला आणि जनतेला ही रक्कम भरावी लागते, ही बाब अत्यंत क्लेषदायक असून लोकांना यामुळे मोठा धक्का बसत आहे. ​सावंतवाडीतील नागरिक आपली करपट्टी किंवा काही वर्षांपासून आकारण्यात येणारा स्वच्छता कर यापोटी नगरपरिषदेने आकारलेली रक्कम वेळेवर, विना थकवता भरत आहेत.

टाईम्स स्पेशल

असे असताना शहरात राहणाऱ्या अनेक अत्यंत गरीब कुटुंबांना दुःखाच्या वेळी या ३००० रुपयांच्या खर्चाचा मोठा सामना करावा लागतो. त्यामुळे दहनासाठी लागणारी लाकडे पूर्ण सरसकट मोफत पुरवण्यात यावीत, असा निर्णय सावंतवाडी नगरपरिषदेने घ्यावा. नुकताच वेंगुर्ला नगरपरिषदेने दहनासाठी वापरलेल्या लाकडांचा शुल्क माफ करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर आता सावंतवाडी नगरपरिषदेनेही हा निर्णय करावा, अशी मागणी सुरेश भोगटे यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg