loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकरी समृद्धीसाठी ’कृषी सखी’ गटाचा स्तुत्य उपक्रम: वणोशी तर्फे पंचनदी येथे शासकीय योजनांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न

वणोशी तर्फे पंचनदी:(सागर गोवळे) - ग्रामीण कृषी कार्य अनुभव कार्यक्रमांतर्गत वानोशी तर्फे पंचनदी येथे ‘कृषी सखी’ गटाच्या वतीने शेतकर्‍यांसाठी विविध शासकीय योजना व डिजिटल सेवांवर एका विशेष प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील १५ पेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते.सहाय्यक कृषी अधिकारी भावे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात शेतकर्‍यांना शेतीविषयक अनेक महत्त्वपूर्ण शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कृषी सखी गटाच्या विद्यार्थिनी शबरी चव्हाण हिने संसाधन व्यक्ती भावे यांचे स्वागत करून केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कृषी सखी गटाने तयार केलेल्या पॉवरपॉइंट सादरीकरणाच्या माध्यमातून भावे यांनी शेतकर्‍यांना विविध कृषी योजना, त्यांचे उद्दिष्टे, फायदे, पात्रता, निकष आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. सरकारी योजनांचा सुरळीत आणि पारदर्शक लाभ घेण्यासाठी ‘शेतकरी ओळखपत्र’ का गरजेचे आहे? आणि त्याची नोंदणी कशी करावी? याविषयी सविस्तर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत, मोबाईलद्वारे अचूक शेती सल्ला, हवामान अंदाज आणि शासकीय योजनांची माहिती मिळवून देणार्‍या ’महाविस्तार ए आय’ च्या वापराचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

सत्र आणि आभार प्रदर्शन मार्गदर्शन सत्रानंतर पार पडलेल्या प्रश्नोत्तर सत्रात शेतकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांच्या मनात योजनांच्या अर्ज प्रक्रियेबद्दल आणि डिजिटल ऍप्सबद्दल असलेल्या शंकांचे भावे यांनी अत्यंत संयमाने निरसन केले. कार्यक्रमाच्या शेवटी कृषी सखी गटातील विद्यार्थिनी संजना जंगले यांनी उपस्थित शेतकरी, मार्गदर्शक भावे आणि ग्रामस्थांचे आभार मानले. हा यशस्वी कार्यक्रम, कृषी सखी गटातील संजना जंगले, शबरी चव्हाण, मधुजा घडशी, पायल मोरे, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम, मुस्कान कसोटीया, नित्या राज या विद्यार्थिनींच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg