रत्नागिरी, (वार्ताहर) ः रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये समुद्रकिनार्यावर बांधण्यात येणार्या ग्रोयन्स बंधार्याला भाट्ये ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला असून याबाबत त्यांनी थेट मत्स्य व्यवसाय व बंदरविकासमंत्री नितेश राणे यांना साकडे घातले आहे. वेळीच हे काम थांबवले नाही, तर भविष्यात भाट्ये गावाचा मिर्या होईल, अशी भीती या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. रत्नागिरीतील भाट्ये खाडी पूल जेथे संपतो त्या ठिकाणी या बंधार्याचे काम सुरू आहे. मुळात जो ठेकेदार हे काम करीत आहे, तो पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून करीत आहे. मग सीआरझेड कायदा असो, वनसंरक्षण कायदा असो वा पाणी ,प्रदुषण कायदा या सर्व कायद्याची पायमल्ली करून निकृष्ट दर्जाचे मटेरिअल वापरून काम सुरू असल्याचा आक्षेपही या ग्रामस्थांनी घेतला आहे. परंतु मुळात भाट्ये ग्रामस्थांनी या बंधार्याची मागणीच केळी नसताना एवढा खटाटोप का सुरू आहे? असा सवाल एक जागृत ग्रामस्थ राकेश गजानन भाटकर व अन्य ग्रामस्थांनी केला आहे.
१९ मे २०२६ रोजी भाट्ये ग्रामस्थांनी सविस्तर निवेदन मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांंना दिले. परंतु या मंत्रालयाने काहीच दखल घेतलेली नाही. या ग्रामस्थांचे एवढेच म्हणणे आहे की, या बंधार्यामुळे गावातील किनार्याच्या दक्षिणेकडील भागात मोठी धूप होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित बंधार्याच्या बाजूला आमच्या घरांच्या व जमिनीच्या जवळपास दोन प्रमुख जागा येतात. हा भाग नेहमी धोक्यात असतो. रत्नागिरीतील नर्मदा सिमेंट भगवती बंदर येथील आणि मिरकरवाडा येथील बंधार्यांमुळे मिर्या गावाची जी अवस्था झाली आहे. हे जिवंत उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे आमचे जीवन धोक्यात घालु नका ,अशी कळकळीची विनंती हे ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान भाट्ये बीच हे केवळ गावकर्यांचे नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. ह्या बीचला हजारो पर्यटक भेट देतात. यामुळे गावातील स्थानिक लोकांना अनेक रोजगार उपलब्ध झाले आहेत. नव्हे तर गावची ती मुख्य उपजीविका बनली आहे. या बंधार्यामुळे किनार्याची धुप होणार असून समुद्र आत सरकला तर किनारा अरुंद होईल. पर्यटकांना फिरण्यास जागा राहणार नाही. पर्यायाने येथे छोटामोठा व्यवसाय करणार्या ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गावातील पारंपारिक मच्छिमार्यांच्या मासेमारी व्यवसायावरही परिणाम होणार आहे. तरी या सर्व बाबींचा गांर्भियाने विचार करून या ग्रोयन्स बंधार्याचे बांधकाम तात्काळ थांबवावे आणि पुर्णपणे रद्द करावे असे भाट्ये ग्रामस्थांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे. या निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.