वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील फाईज स्पोर्ट्स क्लब शृंगारतळी आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेत फैजान इलेव्हन, बोर्या संघ विजेता तर कालिका माता, धोपावे संघ उपविजेता ठरला. पावसाळी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जानवळे फाट्यासमोर, गोल्डन पार्क मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेचे आयोजक फाईज स्पोर्ट्स क्लबचे धनंजय मोरे, सर्वेश साळवी, नासिम साल्हे व सर्व प्रतिनिधी होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक - फैजान इलेव्हन बोर्या संघ यांनी पटकावला त्यांना ३३ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह तर द्वितीय क्रमांक - कालिका माता धोपावे संघाने प्राप्त केला. त्यांना रोख २१ हजार रुपये व सन्मान चिन्ह देण्यात आले. या स्पर्धेमध्ये मालिकावीर पुरस्कार प्रिन्स ऑफ जयगड सुदर्शन मयेकर, उत्कृष्ट फलंदाज परेश शिरगांवकर (धोपावे), उत्कृष्ट गोलंदाज मयूर झर्वे (बोर्या) या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन व्यापारी संघटना अध्यक्ष अजित बेलवलकर, पाटपन्हाळे ग्रामपंचायत उपसरपंच आसिम साल्हे, पोलीस पाटील विशाल बेलवलकर, माजी पोलीस पाटील पाटील, सत्यप्रकाश चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मुस्तकिम मुकादम, नासीम साल्हे, मुस्तुफा साल्हे, अन्वर साल्हे, शाहिद धामस्कर, मुबीन ठाकूर इत्यादी उपस्थित होते.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व ज़िल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, ज्येष्ठ समाजसेवक शाबीर भाई साल्हे, ईस्माईल घारे, इक्बाल धामणस्कर, उस्मान साल्हे, मुस्तफा साल्हे, कोतळूक उपसरपंच सचिन ओक, पाटपन्हाळे ग्रामपंचायत उपसरपंच आसिम साल्हे, पप्या पाटील, शामू साळवी, बंड्या मोरे, हॉटेल हेमंतचे मालक उद्योजक ओंकार संसारे उपस्थित होते. या स्पर्धेचे समालोचन अमित आदवडे, साईराज दाभोलकर, शुभम बारगुडे, आसिम साल्हे, चेतन गुरव, दीपक देवकर, अंतिम संसारे यांनी केले तर स्पर्धेचे पंच म्हणून कैलास पिलणकर, बंटी पावसकर, सुमित टाणकर, अल्पेश वराडकर, अक्षय रोहिलकर यांनी काम पाहिले. नवलाई इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.