दापोली (वार्ताहर) - सोवेली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथील एकात्मिक पिक पद्धती प्रकल्पांतर्गत पिक पद्धतीतील बदल या केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी मंत्रालयच्या माध्यमातून विविध बियाणे व गोळीखत (युरिया डीएपी ब्रिकेट) वाटप करण्यात आले. कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षीय विद्यार्थिनींनी ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गट मृदगंध, गट वसुंधरा, आणि गट कृषीकन्या यांनी सोवेली येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ.नामदेव म्हसकर, शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित एकात्मिक कृषी पद्धती प्रकल्प, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांच्यासमवेत प्रियांका यांनी देखील उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रम अधिकारी, डॉ. प्रवीण झगडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारीत जाती, त्यांना आवश्यक खतांची मात्रा व युरीया डीएपी ब्रिकेट्स यावर चर्चा केली. याचबरोबर कोकण भागात पशुपालनाचे प्रमाण घटत असतानाही सोवेली येथील शेतकऱ्यांनी पशुपालनाचे काम सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले आणि जोखीम व्यवस्थापनासाठी इतरांनाही पशुपालनाचा आपल्या शेतीमध्ये समावेश करण्याचे आवाहन केले. डॉ.नामदेव म्हसकर यांनी शेतकऱ्यांना एकात्मिक शेती पद्धती याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित बियाणांचे वैशिष्ठ्ये सांगून वाटप केले. यामध्ये १०.५ किलो भेंडी बियाणे (कोकण भेंडी), ६०० ग्राम मिरची बियाणे (कोकण किर्ती), ३ किलो वाली बियाणे (कोकण वाली), ६०० ग्राम वांगी बियाणे (कोकण प्रभा), १.८० किलो घोसाळी बियाणे (कोकण घोसाळी), २.४ किलो शिराळी बियाणे (कोकण हरिता) या बियाण्याचा समावेश होता.
तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या युरिया डीएपी ब्रिकेट (नत्र:-३४%, स्फुरद:-१७%,व पलाश:-०%) याचेदेखील वाटप करण्यात आले. उत्पन्न वाढ, पिकांना आवश्यकतेनुसार दीर्घकाळ पोषण मिळणे, खतांचा खर्च कमी होणे, इत्यादी होणारे फायदे आणि शेतामध्ये या खतांचा योग्य वापर कसा करावा हे तंत्रज्ञान समजावून सांगितले. सुमारे ६५ शेतकऱ्यांना ६० किलो ब्रिकेट व ६ सुधारित जातींचे एकूण १८.९ किलो बियाणे देण्यात आले. शेतकऱ्यांनी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बियाण्यांची लागवड व युरिया डीएपी ब्रिकेट तंत्रज्ञान वापरण्याची हमी भरली. सदर कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ.अशोक चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.