loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण बाजारपेठेतून दुचाकी घेऊन अज्ञात व्यक्ती पसार

मालवण (प्रतिनिधी) - मालवण बाजारपेठेतील बँक ऑफ इंडिया समोर उभी करून ठेवलेली ऍक्टिव्हा दुचाकी अज्ञात व्यक्ती घेऊन पसार झाल्याची घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सदर व्यक्ती दुचाकी घेऊन जाताना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवणमधील मिनू देऊलकर व त्यांचे वडील रवींद्र देऊलकर हे ऍक्टिव्हा (MH -15 - 9940) या दुचाकीने बँक ऑफ इंडियामध्ये कामानिमित्त आले असता त्यांनी दुचाकी बँकेसमोर रस्त्याकडेला उभी करून ठेवली होती. बँकेतील काम आटोपून ते बाहेर आले असता दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे बँकेच्या सिसिटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता सदर ऍक्टिव्हा दुचाकी एका अज्ञात व्यक्तीने नेल्याचे दिसून आले. सदर क्रमांकाची ऍक्टिव्हा कुठे दिसून आल्यास 7420823440 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg