loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उपोषण ठिकाणाहून उचलून रुग्णालयमध्ये दाखल करणे घटनेचा दोडामार्गमध्ये निषेध

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - देशातील लाखो विद्यार्थी, पालक, यांच्या भविष्याशी निगडित असलेला नीट परिक्षा पेपरफुटी प्रकरणाला केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असताना सरकार अशा लोकांना पाठीशी घालत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिलेली हिन वागणूक हुकूमशाही माध्यमातून आंदोलन दडपणे, या कृतीचा दोडामार्ग येथील जागरूक नागरिक यांनी निषेध करत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, असे निवेदन दोडामार्गातील जागरूक नागरिकांच्या वतीने दोडामार्ग तहसीलदार यांना देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन सादर केले. यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिलेल्या वागणुकीचा प्रथम निषेध करतो, असे सांगितले. दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणासह शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दीर्घकालीन उपोषण सुरू केले असून त्यास सुमारे वीस दिवसांचा कालावधी झाला असताना त्यांना तेथून उचलून रूग्णालयात दाखल करणे निषेधार्य आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg