loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली शहरातील जुन्या व्यापारी मार्केटच्या जागी नवे संकुल उभारण्याची मागणी, राजेंद्र पेडणेकर, संजय मालंडकर यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी - कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे नगरपंचायत मालकीच्या जुन्या व्यापारी मार्केटची इमारत धोकादायक अवस्थेत आहे. ही जुनी इमारत तातडीने पाडून त्या ठिकाणी आधुनिक व्यापारी संकुल उभारावे, विद्यमान सर्व गाळेधारक व खोकेधारक तसेच दीर्घकाळ भाडेतत्वावर व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांचा नगर संकुलात प्राधान्याने समाविष्ठ करावे, त्यासाठी पहाणी करुन व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र मनोहर पेडणेकर व संजय मालंडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी निवेदन स्विकारुन जुन्या मार्केटबद्दल योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg