loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. उमेश पवार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

गुहागर (संदेश कदम) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार डॉ. उमेश पवार यांची कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या हस्ते डॉ. उमेश पवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ, रत्नागिरी जिल्हा पर्यावरण जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र तांबे, जिल्हा संघटक अजित तांबे, चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. उमेश पवार यांच्या नियुक्तीमुळे कोकण प्रदेशात रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, तसेच पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. डॉ. उमेश पवार यांच्या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg