loader
Breaking News
Breaking News
Foto

शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे 'हृदयरोग निवारण' विषयावर व्याख्यान संपन्न

आबलोली (संदेश कदम) - शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गासाठी हृदयविकाराबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने 'हृदयरोग निवारण' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वालावलकर रुग्णालय, डेरवण येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. प्रणव शामराज हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले. त्यांनी हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असलेली जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक ताण-तणावाचे व्यवस्थापन, पुरेशी झोप तसेच धूम्रपान, मद्यपान यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी त्यांनी उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, वाढलेले कोलेस्टेरॉल यांसारख्या जोखीम घटकांवर वेळेवर नियंत्रण ठेवणे, नियमित आरोग्य तपासणी करणे आणि हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित वैद्यकीय उपचार घेणे किती आवश्यक आहे, याबाबत उपस्थितांना माहिती दिली. आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रत्येकाने आरोग्यदायी सवयी अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.व्याख्यानानंतर उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हृदयविकार प्रतिबंध, आहार, व्यायाम व नियमित आरोग्य तपासणी यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. डाॅ. प्रणव शामराज यांनी त्यांच्या शंकांचे सविस्तर निरसन करून दैनंदिन जीवनात अंगीकारावयाच्या आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी प्रमुख व्याख्याते डाॅ. प्रणव शामराज यांचे स्वागत करून प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. उपस्थितांनी हा उपक्रम अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरल्याची भावना व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg