loader
Breaking News
Breaking News
Foto

चौके पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर

मालवण (प्रतिनिधी) - चौके पंचक्रोशीतील व मालवण तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग आणि श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबीर गुरुवार दि ९ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत भ ता च म माध्यमिक विद्यालय चौके येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सकाळच्या सत्रात योगशिबीर, ध्यानसत्र, मानसिक आरोग्य व समुपदेशन, आहार मार्गदर्शन, व्यायाम व प्रात्यक्षिके, आनंदी जीवनशैली याविषयी फिजिओथेरपिस्ट, योग प्रशिक्षक, आहारतज्ञ, आरोग्य समुपदेशक आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून ज्येष्ठ नागरीकांची बीपी, शुगर, नाक, कान, डोळे, घसा तपासणी, इसीजी, सीबीसी, रक्ततपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तरी या शिबिराचा चौके पंचक्रोशीतील तसेच मालवण तालुक्यातील ज्यांना येणे शक्य आहे, अशा ज्येष्ठ नागरीकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून या मोफत वैद्यकिय शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय भवन सहाय्य विभाग समाज कल्याण सिंयुदुर्गचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे आणि श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळाचे सचिव योगेश पाटील यांनी केले आहे. हें शिबिर यशस्वी करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व सरपंच व पोलिस पाटील सहकार्य करणार आहेत. तर सौजन्य म्हणून स्त्री-पुरुष ज्येष्ठ नागरिक सेवासंघ पंचक्रोशी अध्यक्ष, गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली, सरस्वती फाऊंडेशन कणकवली आणि चौके पंचक्रोशीतील सर्व सरपंच आणि पोलिस पाटील यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg