खेड : आयसीएस महाविद्यालय, खेड येथे महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान व सहायता केंद्रांतर्गत राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी करिअर कट्टा प्रतिनिधींचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी करिअर कट्टा प्रतिनिधी म्हणून खालील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
साहिल भुवड( मुख्यमंत्री) खणसा परवेज महाडिक (नियोजन मंत्री), सदफ अशफक मुकादम कायदे व (शिस्तपालन मंत्री), रुमेसा मोबिन हमदूले (सामान्य प्रशासन मंत्री) सर्वेश उदय पवार(माहिती व प्रसारण मंत्री) ऋषभ महेंद्र बुरटे (उद्योजकता विकास मंत्री) अदनान कासिम कादरी (रोजगार व स्वयंरोजगार मंत्री) तन्वी अविनाश जाधव (कौशल्य विकास मंत्री ) तन्वी आनंद घोले (संसदीय कार्यमंत्री) अनुष्का सुभाष झोरे (महिला व बालकल्याण मंत्री) भक्ती महेश जाडे (सदस्य) कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य डॉ. आर एस भालेराव यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच प्रा. एम. के. केळकर यांनीही विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्याचे महत्त्व, विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आणि कौशल्य विकास याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी तसेच करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक डॉ. सी. आर. साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा. अस्मा पंगारकर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा च्या महाविद्यालयीन समन्वयक प्रा. सुप्रिया काडगे यांनी केले, तर प्रा. एम. के. केळकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.