सावंतवाडी : प्रत्त्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या क्षमता घेऊन जन्माला आलेला असतो. त्यामुळे आपल्या क्षमता ओळखून स्वतःचा विकास करावा, इतरांशी तुलना करू नये असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सचिव व्ही.बी. नाईक यांनी केले. आर.पी.डी. हायस्कूल व ज्यु. कॉलेजमधून मार्च २०२६ च्या एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्था उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती चौकुळ अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सदस्य संदीप राणे, माजी मुख्याध्यापक मुळीक, सावंत, बी.एस.पाटील, विद्यमान मुख्याध्यापक कशाळीकर, प्र. प्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक नामदेव मुठे, सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी - पालक उपस्थित होते.
यावेळी प्रशालेत माध्यमिक विभाग इ. १० वीमधून प्रशालेत प्रथम जोशी योगेश विवेकानंद, द्वितीय राऊळ दिनेश कृष्णा, तृतीय तेरेदेसाई अद्विता प्रसाद याचबरोबर इतर यशस्वी गुणवत्ताधारक परब आयुष प्रविण, गावडे वैष्णवी कृष्णा, सांगेलकर मैत्रेयी प्रसाद, वर्णेकर नक्षत्रा गोविंद, बांदेकर रुची विश्वनाथ, सातवळेकर रामचंद्र जयंत, नाईक ऋतुजा नरेंद्र, राऊळ नंदिनी संजय, कुबल शुभंकर संजय, राणे तनिष्का अजित, परब आर्या रणजित, दळवी पार्थ प्रवीण, परब रामचंद्र विजय, निधी एकनाथ दळवी, प्रणव सदाशिव साधले, वरद सतीश मराठे, प्रचिती चंद्रकांत गावडे, अनुष्का लक्ष्मण राऊळ या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कमेची पारितोषिके व सुपारीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
कृतज्ञता भेट म्हणून एस.एस.सी बॅचने डिजिटल ॲडव्हर्टायझिंग LED स्क्रीन शाळेला प्रदान केली. तसेच स्व.नाम. भाईसाहेब सावंत स्मृतीदिन निमित्ताने ३८ विद्यार्थ्यांना देणगीदारांच्या माध्यमातून शालेय गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी पालक-शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पालकांच्यावतीने तेरेदेसाई, संजय कुबल, विश्वनाथ बांदेकर यांनी तर विद्यार्थ्यांमधून अद्विता तेरेदेसाई, रामचंद्र सातवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कशाळीकर तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक दशरथ शृंगारे व सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका पूनम कदम यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.