loader
Breaking News
Breaking News
Foto

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशोत्सव व बारावी गुणगौरव संपन्न

मालवण(प्रतिनिधी)- मालवण येथील स.का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशोत्सव व बारावी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष विजय केनवडेकर, प्रमुख अतिथी रेकोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय खोचरे व हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्रीनाथ फणसेकर, प्राचार्य कैलास राबते, अंबिका कॉम्प्युटरचे विद्याधर केनवडेकर, लेफ्टनंट प्रा. एम आर. खोत तसेच अग्निवीर सेनेमध्ये भरती झालेला माजी विद्यार्थी बिरु बाळासो खरात आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व मान्यवरांचे स्वागत करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.स्नेहा बर्वे यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा. हसन खान यांनी करून दिला. मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अकरावी मधील नवोदित विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचेही बक्षीस वितरण करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य राबते यांनी आपल्या मनोगत आतून विद्यार्थ्यांना बदलत्या युगातील आवाहनांची ओळख करून दिली. अध्यक्षीय भाषणात विजय केनवडेकर यांनी विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव देऊन कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अन्वेषा कदम यांनी केले तर आभार प्रा.हर्षदा धामापूरकर यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg