loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड येथे ‘सीए’ दिन साजरा

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेड येथे ‘सीए‘(चार्टर्ड अकाउंट्स) दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंट्स सीए या व्यवसायाचे महत्त्व त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण करिअरच्या संधी तसेच देशाच्या आर्थिक विकासामध्ये सीए ची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वाणिज्य शाखेच्या प्राध्यापिका सौ. रुपाली बोडस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सीए कोर्स विषयीची माहिती सांगितली. सीए (चार्टर्ड अकाउंटंट) ही देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक व्यावसायिक पात्रतांपैकी एक असून, आर्थिक व्यवस्थापन, लेखापरीक्षण आणि करव्यवस्थापन क्षेत्रात तज्ञ घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाप्रसंगी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढण्यास तसेच भविष्यात सीए होण्याची प्रेरणा मिळण्यास मदत झाली. ङ्ग ङ्ग सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके, वाणिज्य विभागातील सर्व शिक्षक, इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg