रत्नागिरी - एकीकडे महावितरण विजग्राहकांना स्मार्ट प्रीपेड, पोस्टपेड मीटरची सक्ती करत असताना दुसर्या बाजूला मात्र महावितरणचा भोंगळ कारभार पहायला मिळत आहे. महावितरणच्या कर्मचार्यांना दिवसभर काम असतेच असे नाही, त्यामुळे सोमवार या दिवशी विज वाहिन्यांची तपासणी करायला हवी, पण तशी केली जात नाही आणि शेवटी सामान्य नागरिकांना मात्र अंधारात रहावा लागते. हा नेमका प्रकार तरी काय चाललाय असा संतप्त सवाल तोणदे-हातीस-टेंबे-पोमेंडी-सोमेश्वर पचक्रोशीतील विजग्राहक विचारत असून पावसाळा सुरु झाल्यापासून हैराण झाले आहेत.
सतत रात्री लोकांना अंधारात काढावी लागत आहे. महावितरण सदर विजग्राहकांना स्मार्ट विजसेवा देण्यास असमर्थ ठरले आहे. तीन वर्षांपूर्वी या विषयावरून मोठा मोर्चा काढून सदर भागातील ११ केवी विजवाहिनी भूमिगत करण्याचे आश्वासन देऊनही महावितरण निधीचे कारण पुढे करून हजारो विजग्राहकांना दर पावसाळ्यात कायम अंधारात ठेवत आहे. आणि सदर आलेख हा दरवर्षी पावसाळ्यात वाढत जात आहे.
कुरतडे-तोणदे ११ केवी जोडून रिंग रूट करणे. टेंबे-हातीस ११केवी वाहिनी जी काजळी नदी किनारी भागातून गेलेली आहे. ती रस्ता जवळून नेणे. यासारख्या गोष्टीकडे वरिष्ठ वर्ग दुर्लक्ष करत आहे. या वर्षी तर वार्याचे कारण असले तरी वारा नसतानाही जोराचा पाऊस झाल्यावर सदर भागातील ११ केवी वहिनीला ट्रिपिंग येत आहे. याचा उद्रेक होऊन सदर भागातील विजग्राहक कोणत्याही क्षणी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेण्याच्या तयारीत असून तीन वर्षांपूर्वी जसे आंदोलन झाले त्यापेक्षा मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.