कळझोंडी धरणातील प्रलंबित विकास कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी पंचायत समिती सदस्या आणि माजी सभापती अनुष्का अभय खेडेकर यांनी महाराष्ट्र शासनाचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. खेडेकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, त्यांच्या पंचायत समिती गणातील कळझोंडी धरणातून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणाच्या भिंतीमुळे पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, कळझोंडीकडून वरवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आवश्यक ती संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही.
संरक्षक भिंत नसल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. रस्ता खचल्यामुळे आणि वाहतुकीसाठी धोकादायक बनल्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. याचा मोठा फटका स्थानिक ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना बसत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत, या ठिकाणी संरक्षक भिंत आणि रस्ता मंजूर करून तो वरचे वरवडे मराठी शाळेपर्यंत करण्यात यावा हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी नम्र विनंती अनुष्का खेडेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात केली, यावेळी साहेबांनी सदर कामाला निधी उपलब्ध करून तातडीने काम मार्गी लावण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख बाबूशेठ म्हाप, सभापत प्रवीण पांचाळ, शिवसेना उपतालुकाप्रमुख अभय खेडेकर, उपविभाग प्रमुख अजीम चिकटे उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.