संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - मागील चार दिवसापासून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोसळणाऱ्या धुवाधार पावसामुळे गांधारी सावित्री आणि काळ या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून या नद्यांनी सायंकाळी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाडमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली. व्यापारी तसेच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन दिवसापासून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यामध्ये संततधार पाऊस लागत आहे. दुपारनंतर काळ, सावित्री आणि गांधारी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने संपूर्ण परिसरात पुराची भीती निर्माण झाली आहे.
महाड शहरातील महाड-रायगड मार्गावर अचानक पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तालुक्यात जरी अतिवृष्टी झाली नसली तरी मात्र सावित्री खाडीला लागून असलेल्या दासगाव या ठिकाणी खाडीने पाण्याची पातळी ओलांडून गावलगत शेत जमिनीमध्ये पाणी घुसल्याने या ठिकाणी पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्याचप्रमाणे महाड-रायगड मार्गावर पाणी आल्याने तसेच गांधारी आणि काळनदी भरून वाहत असल्याने तसेच धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरातील व्यापाऱ्याने पुराच्या भीतीने आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सुकळी खिंडीत व नागोठणे येथील जिंदाल कंपनीजवळ रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचाच शुकशुकाट मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाहण्यास मिळत आहे. या महामार्गावरून मुंबई-खेड-चिपळूण-रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या अनेक वाहनांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या धाब्यांवर, हॉटेलवर तसेच साईड पट्ट्यांवर थांबवली आहेत. त्यामुळे एकंदरीत मुंबई व राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहनांचा शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.