वैभववाडी (प्रतिनिधी) - वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात तिथवली ग्रामस्थ आक्रमक झाले. बुधवारी दुपारी पाच तास धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले जोपर्यंत तुमचे वरिष्ठ अधिकारी येत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला अखेर दुपारी ४ च्या नंतर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांनी वैभववाडी येथे येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. गेले अनेक दिवस तिथवली व डिगसी परिसरातील गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे वीज ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती पंपावरही त्याचा परिणाम होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे तिथवली, डिगसी परिसरातील ग्रामस्थांनी माजी सभापती तथा भाजपनेते नासीर काझी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी वैभववाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.
मात्र स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याकडून ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे ग्रामस्थ अधिक संतप्त झाले त्यांनी जोपर्यंत वीज वितरण कंपनीचे अधिकारी अभियंता येथे येत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा दिला. अखेर सायंकाळी चार वाजता वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भांबरे हे आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी कार्यकारी अभियंता समोरच वीज वितरण कंपनीच्या कारभाराचे आंदोलकांनी वाभाडे काढले. उपअभियंता चव्हाण यांची बदली होऊन महिना झाला तरी त्यांच्या जागेवर दुसरा अभियंता आलेला नाही जर बदली झालेले अधिकारी येथे आले नाही. तर त्यांना का सोडले? असाही प्रश्न सभापती सिद्धेश रावराणे यांनी केला. तर लवकरच त्यांच्या जागी अधिकारी हजर होतील, असे सांगितले. हजर होणार नाहीत त्यांना नोटीस काढली असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.
जे वायरमेन योग्य पद्धतीने काम करत नसतील, लोकांशी उद्धट वागत असतील अशांना नोटीस काढा. जर ऐकत नसतील तर त्यांना कामावरून काढून टाका, असे आदेश कार्यकारी अभियंता यांनी दिले. भुईबावडा विभागात जीर्ण वीज खांब वीजवाहिन्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. वारंवार तक्रार करून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अपघात घडून जीवितहानी होण्याची वाट पाहत आहात का ? असा प्रश्न नासीर काझी यांनी विचारला. यावेळी पंचायत समिती सदस्या सुवर्णा संसारे, महेश संसारे, इब्राहिम काजी, जयराज हरियाण, महादेव हरियाण, ओंकार हरियाण, अनिकेत कुडतळकर, मजीद सोलकर, रोहिणी कुडाळकर, विजय कुडतरकर, अनिल हरियाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.