कडवई येथील सुप्रसिध्द श्री वरदान देवी देवस्थानचे भूतपूर्व सरचिटणीस व कडवई हायस्कूल चालविणार्या ‘कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळा’चे विश्वस्त श्री. प्रकाश शंकर घोसाळकर यांचे शुक्र. दि. १७ जुलै रोजी देहावसान झाले. निधनसमयी त्यांचे वय ७६ वर्षे इतके होते. प्रकाशराव घोसाळकर हे कडवई दशक्रोशीतील विकास कामात सदैव अग्रेसर असत. वरदान देवी देवस्थानच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नरम गरम होती. मार्च २०२६ मध्ये त्यांच्या पत्नीचे आकस्मिक निधन झाले, त्याचा त्यांना मोठा मानसिक धक्का बसला व केवळ ४ महिन्याच्या आत त्यांचेही दु:खद निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर ते डोंबिवली येथे राहत होते. शुक्र. दि. १७ जुलै रोजी अकस्मात त्यांची प्रकृती उपचारांना साथ देईनाशी झाली व रात्री ११ चे सुमारास त्यांचे दु:खद निधन झाले. त्यांचा कडवई येथील श्री वरदान देवी देवस्थानच्या जिर्णोध्दारात सिंहाचा वाटा आहे. या देवस्थानसाठी ट्रस्ट स्थापन करण्यापासून ते देवस्थान जिर्णोध्दारा पर्यंतच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सहभाग असे, किंबहुना ते प्रत्येक कार्यात अग्रभागी असत. या देवस्थानचा जिर्णोध्दार करुन देवस्थानच्या कारभाराची उत्तम घडी बसवण्यामध्ये देखील त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
जणू त्यांच्या नेतृत्वाखाली वरदान देवी देवस्थानचा जिर्णोध्दार संपन्न झाला व दशक्रोशीतील एक कार्यक्षम देवस्थान म्हणून देवस्थान सुपरिचित झाले. कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूल चालविणार्या ‘कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळा’चे देखील ते अनेक वर्षांपासून सरचिटणीस होते.शाळेचा कारभार उत्तम प्रकारे सुरु रहावा व शाळेतील मुले गुणवंत, यशवंत व्हावीत यासाठी त्यांची तळमळ असे. त्यांच्या निधनाचे वृत्त काही वेळातच मुंबई पासून कडवई पर्यंत सर्वत्र पसरले. अशा प्रकारे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच कडवई पंचकोशीतील नागरिकांनी तसेच देशात विविध ठिकाणी असलेल्या घोसाळकर, पवार बांधवांनी तीव्र शोक व्यक्त केला. त्यांची अंत्ययात्रा आज डोंबिवली येथील त्यांच्या निवासस्थानावरुन निघाली व दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी घोसाळकर, पवार बांधव तसेच कडवई पंचक्रोशीतील अनेक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांच्या मागे दोन विवाहित चिरंजीव, सुना, विवाहित कन्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी व बारावे, तेराव्याचे विधी त्यांचे ‘३०३/बी, नटराज दर्शन, गणेश नगर, अपॉसिटी ५२ चाळ, डोंबिवली (प.) - ४२१२०२ येथे होणार असल्याचे श्री. प्रवीण घोसाळकर (मोबा. ९७६९७०८८६३) यांनी कळविले आहे.
कै. प्रकाश घोसाळकर यांचे निधनाचे वृत्त समजताच रत्नागिरीतील श्रीराम मंदिर संस्था व मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ‘‘त्यांनी वरदान देवी देवस्थानसाठी तसेच कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळासाठी फार मोठे कार्य केले आहे. त्यांची उणीव भासेल. त्यांच्या आत्म्याला परमेश्वर चिरशांती देवो’’ अशा शब्दात त्यांनी श्रध्दांजली वाहिली. कै. प्रकाश घोसाळकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच दै. ‘रत्नागिरी टाइम्स’चे संपादक श्री. उल्हास घोसाळकर यांनी कडवई दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण केली. त्यांनी सांगितले, ‘‘वरदान देवी देवस्थान उत्तम प्रकारे कार्यरत व्हावे यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. ट्रस्ट स्थापन करण्यापासून ते मंदिराचा जिर्णोध्दार होवून व्यवस्थापनाची उत्तम घडी बसवण्या पर्यंत जे जे आवश्यक ते सर्व कार्य त्यांनी केले. वरदान देवी देवस्थानच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच कडवई हायस्कूल चालविणार्या कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळासाठी देखील त्यांनी भरीव कार्य केले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना’’ अशा शब्दात त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.