loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्य मेकॅनिक महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद पवार यांची नियुक्ती

केळंबे-लांजा, (सिराज नेवरेकर) - महाराष्ट्र राज्य मेकॅनिक महासंघाच्या सोलापूर येथील मुख्य कार्यालयात केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या झालेल्या सभेमध्ये एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मेकॅनिक महासंघाचे कोकण विभागीय अध्यक्ष मिलिंद शेठ पवार यांची महाराष्ट्र राज्य मेकॅनिक महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंद शेठ पवार हे लांजा तालुक्यातील एक अनुभवी व लोकप्रिय मेकॅनिक म्हणून परिचित आहेत. सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशनचे धडाडीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनेच्या बळकटीकरणासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे कोकण विभागातील मेकॅनिक बांधवांच्या विविध समस्या, कौशल्य विकास, तांत्रिक प्रशिक्षण तसेच संघटनात्मक प्रश्न अधिक प्रभावीपणे महासंघापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg