loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक कार्यकर्ते व गणेश बिल्लार यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान

खेड (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गणेश बिल्लार यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश बिल्लार यांचा जन्म २३ जून १९९२ रोजी झाला. अत्यंत प्रतिकूल आणि आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजकीय क्षेत्रातही त्यांनी अलीकडेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडत राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर योगेश कदम यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत युवासेनेच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा सचिवपदाची जबाबदारी सोपवली. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्यातून पक्ष नेतृत्वाचा विश्वास संपादन केला आहे. गणेश बिल्लार यांनी ‘स्वराज्य प्रतिष्ठान’च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, जनजागृती कार्यक्रम तसेच गरजूंसाठी विविध सेवा उपक्रम राबविले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. पत्रकार म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था अकादमीचा पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या सामाजिक कार्याची आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल घेत पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ, राजवाडे हॉल, सदाशिव पेठ येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर गणेश बिल्लार यांनी हा सन्मान आपल्या सहकाऱ्यांना आणि समाजातील सर्व घटकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. समाजहितासाठी यापुढेही अधिक जोमाने कार्य करत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या यशाबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg