सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात विश्रांतीसाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या धर्माची शिकवण देणाऱ्या काही परराज्यातील मिशनरींना पोलिसांनी ताब्यात घेतले. हिंदू संघटनांनी या प्रकारावर आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. सावंतवाडी पोलीस ठाण्यात चौकशी केल्यानंतर या मिशनरींना पोलिसांनी लेखी समज देऊन सोडून दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन सुट्टीच्या वेळेत काही विद्यार्थी जगन्नाथराव भोसले उद्यानात विश्रांतीसाठी बसले होते. यावेळी तेथे आलेल्या काही मिशनरींकडून या विद्यार्थ्यांना धर्माची शिकवण दिली जात होती. हा प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरू असल्याचे समोर आले आहे.
आज हा प्रकार सुरू असतानाच एका सजग महाविद्यालयीन विद्यार्थ्याने या घटनेचे मोबाईलवर छायाचित्रण (चित्रीकरण) करण्यास सुरवात केली आणि तात्काळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. छायाचित्रण सुरू झाल्याचे लक्षात येताच संबंधित मिशनरींनी उद्यानातून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून जाब विचारला असता, आपण विद्यार्थ्यांना आपल्या धर्माची शिकवण देत असल्याची कबुली त्यांनी दिली.यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांना पाचारण करत संबंधितांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली. हे मिशनरी मूळचे गोवा राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
चौकशीदरम्यान ते तिघेही ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्या वयाचा विचार करून पोलिसांनी त्यांना कायदेशीर समज देऊन सोडून दिले. पुन्हा असे प्रकार केल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी अशा प्रवृत्तींपासून सावध राहावे आणि असे संशयास्पद प्रकार आढळून आल्यास तात्काळ पोलीस प्रशासन किंवा हिंदू संघटनांशी संपर्क साधावा, असे आवाहन बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.