loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयाचे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश

खेड- रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत संगमेश्वर तालुका तायक्वांदो ऍकॅडमी आणि नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते १२ जुलै रोजी घेण्यात आलेल्या २४ वी सब ज्युनिअर व ९वी कॅडेट २४ वी सिनिअर क्युरोगी आणि १३वी सब-ज्युनिअर व सिनिअर पुमसे जिल्हा अजिंक्य तायक्वांदो स्पर्धा २०२६ यामध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये शौर्य शिंदे याने सुवर्णपदक प्राप्त केले असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच आरुष जाधव याने कांस्यपदक पटकावले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे कौशल्य दाखवून विविध पदके प्राप्त केली. विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका सिद्धी बाळकृष्ण पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

टाइम्स स्पेशल

संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ.एस.एस.अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg